#

ओळख कलाकृतीची - ओळख कलाकाराची

माझा परिचय :
मी संगीता वेरूळे ( पुणे) मागील २० वर्षांपासून कला क्षेत्रात कार्यरत आहे. विविध प्रकारच्या हँडीक्राफ्ट वस्तू , पेंटिंग्ज, रांगोळी प्रकार, हॅण्डमेड बॅग्ज , मोती वर्क , म्यूरल्स , सण - सजावटीच्या वस्तू बनवित आहे , तसेच फॅशन डिझायनींग हे सुद्धा माझे आवडते क्षेत्र आहे, त्याचे विविध कोर्सेस सुद्धा घेतले जातात. थोडक्यात सांगायचे तर आपणांस जर कलेची आवड / छंद असेल आणि आपण काही नाविन्यपूर्ण गोष्टींच्या शोधात असाल तर 'कलाकृती' हे आपल्यासाठी अगदी योग्य ठिकाण आहे.

छंद जोपासणे म्हणजे काय तर आपल्या आवडत्या गोष्टीत रममाण होणे , आपले हस्तकौशल्य वापरून एखादी छानशी वस्तू बनविली कि मनाला आनंद तर वाटतोच पण त्याबरोबरच विरंगुळा मिळतो , करमणूक होते. वस्तू कशा बनवाव्यात , त्यासाठी काय साधनसामुग्री लागते, त्या आकर्षक बनविण्यासाठी काय करावे लागते तसेच विणकाम, भरतकाम, शिवणकाम याबद्दलची पूर्ण माहिती इथे आपणांस मिळेल.

मी बनविलेल्या कलात्मक वस्तू , कोर्सेस बद्दलची पूर्ण माहिती आपण याच वेबसाईटवर पाहू शकता. ऑर्डर करू शकता, शिकू शकता आपण फोन / इ-मेल द्वारे संपर्क करू शकता.



कलाकृती येथे प्रत्येक उत्पादन आणि अभ्यासक्रम नावीन्यपूर्ण, अद्वितीय आणि हॅण्डक्राफ़्टेड आहे


आमच्या सुंदर केलेल्या डिझाईनमध्ये वेगवेगळे प्रकार घेऊन आले आहे. रांगोळ्या, आकाशकंदिल , तोरण, दिवे, पणत्या, पेंटिंग्ज, सरस्वती चिन्ह, दरवाजा लटकन तुमच्या सणांना व घरच्या सजावटीसाठी आणखी शोभा आणतील. मोती, मणी, कुंदन, लेस, फुले असे बरेच काही वापरून विविध प्रकार तयार केले आहेत. तुम्ही या वस्तू दिवाळीसाठी भेटवस्तू म्हणून वापरू शकता. या वस्तू तुम्ही ओल्या कपड्याने पुसून स्वच्छ करू शकता. सणासुदीचा हंगाम चालू आहे. आपल्या प्रियजनांना एक सुंदर गिफ्ट हॅम्पर देऊ शकता.

संकल्पना, उत्पादने आणि प्रशिक्षण यामध्ये नावीन्य दाखविणारी सर्जनशील उत्पादने तयार करणे हे माझे उद्दिष्टय आहे. अशा उद्दिष्ट्य प्राप्तीमुळे आत्मविश्वास वाढतो आणि आपल्याला स्वतःचा अभिमान वाटू लागतो .

Whatsapp Chat
×